पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत खोटे बोललेत’ – प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण

0

नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 10 घरांच्या चाव्या देण्यांचा शिर्डी येथील कार्यक्रम म्हणजे आवळा देवून भोपळा काढण्याचा प्रकार असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी केली. साईबाबांच्या दर्शनासाठी येऊन पंतप्रधान घरकुल योजनेबाबत खोटे बोलले असल्याचे चव्हाण यांनी म्हंटले आहे. मोदींनी दिशाभूल करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केल्याचा दावाही यावेळी चव्हाण यांनी केला.

यूपीएच्या काळात 4 वर्षात केवळ 25 लाख घरकुल झाली होती, असा दावा पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केला होता. मात्र, पंतप्रधान मोदींचा हा दावा खोटा असल्याचे चव्हाण म्हणाले. 2004 ते 2013 या युपीएच्या काळात इंदिरा आवास योजनेत 2 कोटी 24 लाख घरकूल झाल्याचा दावा चव्हाणांनी केला. पंतप्रधानांनी आतापर्यंत झालेली आपली चूक मान्य करुन पुढे तरी आपल्याला सद्बुद्धी दे असं सांगितलं असतं तरी पुष्कळ झालं असतं. पण पंतप्रधान शिर्डी येथे साईबाबांच्या नगरीत जाऊनही खोट बोललेत, असे टिकास्त्र चव्हाण यांनी सोडले आहे.