पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी भुतानच्या दौर्‍यावर

0

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी भूतान दौर्‍यासाठी रवाना होणार आहेत. भूतानचे पंतप्रधान डॉ. लोटे शेरिंग यांनी मोदींना भूतानमध्ये येण्याचे आमंत्रण दिले होते. त्यांची ही विनंती मान्य करून पंतप्रधान भूतान दौर्‍यावर जात असल्याचे परराष्ट्र मंत्रालायकडून सांगण्यात आले. मोदींच्या या पुनर्भेटीला विशेष महत्त्व प्राप्त होणार असून या भेटीमुळे दोन्ही देशांमध्ये मैत्रीचा नवा अध्याय सुरु होणार आहे.
पंतप्रधान मोदींच्या या दोन दिवसीय दौर्‍यात द्विपक्षीय संबंध सुधारणे आणि नेबरहुड पॉलिसीवर चर्चा होईल. तसेच या दौर्‍यादरम्यान नरेंद्र मोदी रुपी कार्ड लॉन्च करणार असल्याची माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिली.
या दौर्‍यात भूतानचा राजा नरेश जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि भूटानचा चौथा राजा नरेश जिग्मे सिग्ये वांगचुक यांचीही भेट घेणार आहेत. तसेच ते भूतान रॉयल विद्यापीठातील विद्यार्थ्यांशीही संवाद साधणार आहे.