पंतप्रधान मोदी करणार मंत्र्यांचे ’अप्रायझल’

0

नवी दिल्ली : राष्ट्रपतीच्या निवणुकीनंतर केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मंत्र्यांना त्यांच्या खात्याच्या प्रगतीची व उल्लेखनीय कामगिरीची माहिती द्यावी लागणार आहे. त्यासाठी एक महिन्यात हा अहवाल मंत्र्यांना सादर करावा लागणार आहे.

पंतप्रधानांनी मागील बुधवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत ही सूचना केली आहे. राष्ट्रपती निवडणुकीचे निकाल समोर येण्यापूर्वीच हा अहवाल जमा करावा लागणार आहे. अप्रायझलचा निर्णय म्हणजे मंत्रिमंडळ फेरबदलाचे संकेत असल्याचे बोलले जाते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी दोन वर्षांचा कालावधी राहिला आहे. त्यामुळे भाजप सरकारचे सर्व लक्ष हे त्यांनी मिळवलेले यश आणि विकास कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आहे.

सरकारने तीन वर्षांत केलेले विकास कार्य आणि योजनांना आणखी मजबूत करण्यासाठी नवीन ‘टीम’ बनवण्याचाही विचार सुरू आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पदाचा राजीनामा देऊन गोवा मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली आहे. त्याचबरोबर पर्यावरण मंत्री अनिल माधव दवे यांच्या निधनामुळे त्यांचे पदही मंत्रीपद रिक्त आहे. तसेच भाजपने लोकसभा निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे. त्यामुळे कदाचित पक्ष संघटनेतही बदल केले जाऊ शकते. त्यामुळे काहींना आपले पद सोडावे लागण्याची शक्यता आहे.