पंतप्रधान मोदी फोडणार निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ

0

कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कल्याणात  मंगळवारी मोठा कार्यक्रम होणार आहे. यावेळी होणार्‍या जाहीर सभेतून आगामी लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. पंतप्रधान मोदींच्या या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ते कल्याणात आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

भाजप आणि एनडीएचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नाव जाहीर झाल्यानंतर कल्याणमध्ये याच ठिकाणी फडके मैदानात 2014 ला मोदींची जाहीर सभा झाली होती. त्या सभेनंतर कल्याण आणि आसपासच्या परिसरात एक वेगळाच माहोल तयार झाला होता. या पार्श्‍वभूमीवर  मंगळवारी मोदी यांची जाहीर सभा होत असून त्यालाही वेगळेच महत्व असल्याचे राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.