नवी दिल्ली : लाल किल्ल्यावरून गॅस सबसिडी सोडण्याचं आवाहन केल्यावर सव्वाशे कोटी कुटुंबांनी सबसिडी सोडल्याचा अजब दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात केला आहे. दिल्लीत एम्सच्या चार नव्या प्रकल्पांचे उद्घाटन मोदींच्या हस्ते झाले.. त्यावेळी केलेल्या भाषणात मोदी बोलत होते. सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या देशात सव्वाशे कोटी कुटुंबं असतीलच कशी, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. बोलण्याच्या ओघात अनावधाने हा उल्लेख झाला असण्याची शक्यता असली तरी मोदींच्या या विधानामुळे विरोधकांना आयते टीकेसाठी आयता मुद्दा मिळाला आहे.