फैजपूरच्या स्वामीनारायण गुरुकल संस्थेचे दायीत्व
फैजपूर : स्वामीनारायण गुरुकल संस्थेकडून एक लाख 11 हजार 111 रुपयांची मदत कोरोना ग्रस्तांसाठी पंतप्रधान सहाय्यता निधीला देण्यात आली. प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांना धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी सावदा स्वामीनारायण गुरुकुल संस्थेचे अध्यक्ष शास्त्री भक्तीप्रकासदासजी यांनी देशाप्रती प्रेम, आपुलकी, बंध-भाव असून कोरोना या संकटावर मात करण्यासाठी एक खारीचा वाटा म्हणून स्वामीनारायण गुरुकल संस्थेकडून 1 लाख 11 हजार 111 रुपये देणगी देण्यात आल्याचे सांगितले.
दातृत्ववान व्यक्तींनी पुढे येण्याची गरज
समाजातील सेवाभावी नागरीकांनी सढळ हाताने पंतप्रधान सहाय्यता निधी व मुख्यमंत्री सहायता निधीला दान देऊन सहकार्य करावे, असे आवाहन शास्त्री भक्तीप्रकासदासजी यांनी यावेळी केले. आपल्या देशावर कोरोना महामारीचे जे संकट आले आहे ते पूर्ण नष्ट व्हावे य साठी देवाकडे आपण सर्वांनी साकडे घालावे तसेच नागरीकांनी घरी राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन ही शास्त्री भक्तीप्रकाशदासजी यांनी केले आहे.