पंतमहाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त कार्यक्रम

0

जळगाव प्रतिनिधी । शहरातील श्री पंत मंदिर येथे प्रतिवर्षाप्रमाणे ३ सप्टेंबर रोजी सद्गुरू श्री पंतमहाराज जन्मोत्सव व पारंपरिक पद्धतीने श्री पंतमहाराज जन्मोत्सव आरती अवधुता महासोहळा साजरा करण्यात येणार आहे.

या निमित्ताने सोमवारी भक्त मेळावा व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यात सकाळी आठ ते रात्री ८.३० वाजेपर्यंत नामस्मरण, श्रीपंत गुरुचरित्र अध्यायाचे वाचन, भजन सेवा, पाळणा आरती आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी या विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकानी केले आहे.