पंधरा दिवसापासून जीओ मोबाईल सेवा बंद

0

शिंदखेडा। गेल्या सहा-सात महिन्यापासून मोबाईल धारकांना जीओच्या इंटरनेट सेवेची सवय झालेली आहे. मात्र शिंदखेडा येथे गेल्या पंधरा दिवसापासून ही सेवा बंद आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ही सेवा किती दिवस बंद राहिल याबाबत निश्‍चित सांगण्यात येत नाही.

जीओच्या विविध आकर्षक सेवेमुळे शहरातील अनेक अनेकांनी जीओचे ग्राहकत्व स्विकारले. सेवा बंद असल्याने अधिकारी निशीकांत आष्टेकर यांचाशी संपर्क साधला असता. याबाबत माहिती देण्यास नकार देत फोनवर अशी माहिती देता येत नसल्याचे कारण सांगितले. नगरपंचायत मुख्याधिकारी अजित निकत यांचाशी सपर्क केला असता त्यांनी टॉवर उभारणीसंबंधीचे कोणतेच कागदपत्रे नसल्याने नगरपंचायतीने टॉवर अनिधिकृत असल्याचे घोषीत करत टॉवर सिल केले आहे. ज्या जागेवर टॉवर उभारण्यात आला आहे त्याबाबत वाद सुरू असल्याने परवानगी मिळणार नसल्याचे सांगितले.