पंधरा हजार वह्यांचे गरजू विद्यार्थ्यांना मोफत वाटप

0

श्रीरामपूर येथील हिंदुस्तान कॅटल फिडस कंपनीचा उपक्रम
चाळीसगाव – गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करून हिंदुस्तान कॅटल फिडस कंपनीने अनोखी सामाजिक बांधिलकी जपली आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये सुमारे 15 हजार वह्यांचे वाटप करण्यात आले. ही बाब अभिनंदनीय आहे, अशी भावना उंबरखेडे येथील लोकनियुक्त सरपंच केदारसिंग पाटील यांनी व्यक्त केली. हिंदुस्थान कॅटल फीडस कंपनीच्या सीएसआर फंड अंतर्गत तालुक्यातील विविध शाळांमध्ये सुमारे 15 हजार वह्यांचे वाटप मोफत करण्यात आले.

ग्रामीण भागात कंपनीचे कौतुक
उबरखेड येथे झालेल्या मुख्य कार्यक्रमात लोकनियुक्त सरपंच केदारसिंग पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले यावेळी कंपनीचे विभागीय अधिकारी मच्छिंद्र महाजन, चाळीसगाव तालुका विक्री अधिकारी अनिल ठाकूर, दुग्ध व्यवसायिक अभिजीत पाटील, शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध शाळांमध्ये वह्यांचे वाटप शिरसगाव, टाकळी प्र.दे. पिंपळवाड म्हाळसा, पिलखोड, चिंचखेडे, वाकडी, वडाळा-वडाळी, कजगाव यासह अनेक ग्रामीण भागातील शाळांमध्ये जाऊन पहिली व दुसरी च्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन तर तिसरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना चार वह्यांचे वाटप करण्यात आले आहे.कंपनीने विद्यार्थ्यांप्रती ठेवलेल्या आदर भावनेचे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आले आहे.