पं.उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त अभ्यासवर्ग

0

जळगाव । भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरतर्फे पं. दीनदयाल उपाध्याय जन्म शताब्दी वर्षानिमित्त कार्यविस्तारक योजनेंतर्गत 15 दिवसीय योजनेचा अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आलेले आहे. आभ्यासवर्ग 15 दिवसीय असणार आहे. 18 मे गुरूवार रोजी केमिस्ट भवन, सिंधी कॉलनी रोड येथे सायंकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत अभ्यास वर्ग असणार आहे. सायंकाळी 5 वाजता महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या अभ्यास वर्गाला भाजपा प्रदेश संघटन सरचिटणीस प्रा. रवी भुसारी व विभागीय संघटन मंत्री अ‍ॅड. किशोर काळकर हे संबोधित करणार आहेत. यावेळी जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे, आ. स्मिता वाघ, आ. चंदु पटेल आदी उपस्थित होते. अभ्यास वर्ग 5 सत्रात घेण्यात येणार आहेत. 15 दिवसीय अभ्यास वर्गाला उपस्थित राहण्याचे आवाहन विशाल त्रिपाठी, दिपक सुर्यवंशी, शिवदास साळुंखे, महेश जोशी, मनोज भांडारकर यांनी कळविले आहे.