पं.दीनदयाळ योजनेच्या कार्यक्रमाचा समारोप

0

पिंपळनेर । पं. दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त सामोडे (ता. साक्री) गटातील धंगाई, दापूर, रोहण, कालदर, भोनगाव व सामोडे येथे पंडीत दिनदयाळ कार्यविस्तार योजनेचा 25 मे ते 10 जून या कालावधीत प्रचार व प्रसार कार्यक्रम राबविला गेला. या 15 दिवसीय कार्यक्रमाचा समारोपप्रसंगी केंद्र व राज्य सरकारच्या जनकल्याण योजना व शेतकर्‍यांच्या विविध योजनांबद्दल गावकर्‍यांना माहिती देतांना हे सरकार शेतकर्‍यांना उद्योजक बनविणारे सरकार आहे असे भाजपा ओबीसी मोर्चाचे धुळे जिल्हा चिटणीस धनंजय घरटे यांनी सांगितले. या वेळी कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शेतकर्‍यांना उद्योजक बनविणारे सरकार : घरटेंचा दावा
यावेळी घरटे यांनी शेतमजूरासांठी अटल पेन्शन योजना, पीक कर्ज योजना, शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या परवानगी संदर्भात माहीती यांची माहिती दिली. यासोबतच घरकुलासाठीचा वाढीव निधी, आदिवासी खावटी कर्जात व धान्यात वाढ, पीककर्ज योजनेत सुलभता, नाबार्डच्या शेतकर्‍यांसाठी योजना, शेतीमाल प्रक्रिया उद्योगाला चालना आदींबाबत मार्गदर्शन केले. सरकारद्वारे मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला विहीर, ऑनलाईन मागणी अर्ज भरणी, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनाबाबत माहिती दिली. शेतकरी उत्पादक कंपनींना 13 लाखाचे अनुदान, शेतकर्‍यांना थेट बाजारपेठेत माल विक्री करण्याचा अधिकार आदी योजनांबद्दल माहिती देण्यात आली. विविध गावांना झालेल्या कार्यविस्तार योजनेच्या प्रसार व प्रचार कार्यक्रमप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप कोठावदे, तालुका सरचिटणीस रामकृष्ण एखंडे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मोतीलाल पोतदार, तालुका सरचिटणीस भटू निकुंभ, उद्योग आघाडी तालुकाध्यक्ष हेमराज दशपुते, नितिन कोतकर, नैनेश शिंदे, देवा घरटे, विक्रांत भदाणे, माधवराव घरटे, पवन पगारे, विलास घरटे, तुळसीदास घरटे, राकेश भदाणे, अरूण घरटे, संजय घरटे, जितेंद्र सगर, प्रमोद भदाणे, फकिरा पवार, आन्ना राजमल भील, कापसे ,मस्तान शहा, नाना गायकवाड, राजेंद्र माळीच,दादाजी भिल व गावकरीे उपस्थित होते.