चाळीसगावात विविध भागात राबवली मोहीम
चाळीसगाव | शहरात अनेक ठिकाणी कचरा साचला असल्याल्या तक्रराची दखल खुद्द आरोग्य सभापतींनी घेतली असुन त्यांनी स्वतः त्या ठिकाणी जावुन जेसीबीच्या सहाय्याने व मजुरांमार्फत साफसफाईला सुरुवात केली आहे. शहरातील गायत्री प्लॉझा, व्यापारी संकुल, शिवाजी घाट, खरजई रोडवरील सावली बिल्डींग, नगरपालिका गेटजवळ, शासकीय विरामगृह परिसर, दुधसागर मार्गावरील टेलीफोन ऑफीस राष्ट्रीय ज्यनियर कॉलेज गेट परिसर आदि भागात स्वच्छतेचा अभाव व कचरा साचला असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने त्याची दखल नगरपालिका आरोग्य सभापती घुष्णेश्वर पाटील यांनी घेतली.
कचर्याने भरलेले नाले केले मोकळे
यावेळी त्यांनी स्वतःजावुन न.पा.चे सफाई कामगार व जेसीबीच्या सहाय्याने त्याठिकाणावरील घाण, कचरा बुधवारी २० सप्टेंबर रोजी सकाळपासून साफसफाई करण्यास सुरुवात केली. ज्याठिकाणी नाल्यांमध्ये कचरा टाकल्याने भरलेले नाले साफ करून त्यावर ठापे टाकुन त्यावर मुरुम टाकुन ते बुजाविण्यात आले. त्यामुळे चिखल होवुन आता कुठलाही त्रास होणार नाही, याची काळजी घेत असल्याचे व व्यापारी संकुलातील याचलकला कचरा उघड्यावर अथवा रस्त्यावर व फेकता तो कचरा पालिकेची घंटागाडीतच टाकावे, असे आवाहन आरोग्य सभापती घुष्णेश्वर पाटील यांनी केले आहे. यावेळी त्यांचे सोबत स्वच्छता निरीक्षक तुषार नकवाल, धनकचरा ठेकेदार कुदन जाधव हे स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते.