पं.स.च्या भाजपा गटनेतेपदी संजय पाटील निवड

0

चाळीसगाव । चाळीसगाव पंचायत समिती भाजपाच्या गटनेतेपदी पं.स.चे माजी सभापती व पातोंडा गणातून निवडून आलेले सदस्य संजय भास्कर पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. आमदार उन्मेश पाटील यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

यावेळी आमदार उन्मेश पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष के.बी.साळुंखे, जिल्हा परिषद सदस्य मंगलाताई भाऊसाहेब जाधव, माजी प.स.सदस्य जगन्नाथ महाजन, दिनेश बोरसे, रविंद्र चौधरी, भाऊसाहेब जाधव, रुपाली पियुष साळुंखे, वंदना दत्तू मोरे, सुनील साहेबराव पाटील, स्मितल दिनेश बोरसे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार आमदार उन्मेश पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.