एरंडोल (रतिलाल पाटील)। एकेकाळी शिवसेनेचा बाले किल्ला म्हणुन ओळखला जाणारा एरंडोल मतदार संघ पण सेनेच्या गटा-तटा च्या राजकारणामुळे तालुक्यातून सेनेचा बुरुज ढासळताना दिसत आहे. तर एरंडोल लोकसभेचे पद युतीच्या काळात भाजपाकडे तर युती तुटल्या नंतर विधान सभेच्या प्रचारासाठी भाजपाचे पक्षश्रेष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचार सभा घेऊनही विधान सभेचे पद आपल्या पदरात पाडता आले नाही परंतु चालू झालेल्या न.पा.निवडणुकीत पारोळा व एरंडोल लोकनियुक्त नगराध्यक्षपद आपल्याकडे खेचण्यास भाजपला यश आले संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचा एकमेव आमदार म्हणुन निवडून आल्याची ओळख असणारे आमदार डॉ.सतीश पाटील यांनी विधान सभेचेपद राष्ट्रवादीच्या पारड्यात टाकले.
सर्वपक्षिय आजी माजी नेत्यांची निवडणुकीत कंबर कसली
जिल्हापरिषद व पंचायत निवडणुकीत मात्र चौरंगी लढत होण्याचे चित्र आहे. सेना -भाजपा हि स्वबळावर तर काँग्रेस-राष्ट्रवादीने हि अजून आपले आघाडीचे चित्र स्पष्ट केले नाही. या निवडणुकीत सर्वच पक्षांनी आपली कंबर कसली असून तालुक्यातील विद्यमान आजी-माजी आमदार यांचा सत्तेसाठी कस पणाला लागणार आहे. गेल्या निवडणुकीत जिल्हा परीषद व पंचायत समितीच्या सत्तेत सेनेला बहुमत मिळाले होते. सध्या स्थितीत तोड-फोड व गटा-तटाच्या राजकारणाने सेनेची ताकद कमी झालेली दिसत. तर भाजपा व राष्ट्रवादी चे ग्रामीण संघटन कमी असल्याने बहुमत कोणाला मिळणार हे मतदान पेटीतून दिसणार आहे.निवडणूक काळात पक्षांतराचे वारे वाहत असल्याने पक्षांतराचा फायदा नक्की कोणाला होईल हे अजून गुलदस्त्यात आहे. शिवसेनेला निवडणुकीत अपयशाला सामोरे जावे लागले व भाजपचे पक्ष श्रेष्ठी पंतप्रधान मोदी यांनी प्रचार सभा घेऊनही निवडणुकीत मात्र तिसर्या समाधान मानावे लागले होते.
उमेदवारासाठी शोधाशोध
सध्यातरी स्वतः काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन यांनी आम्ही आघाडी झाली तरी व नाही झाली तरी एरंडोल तालुक्यातील कासोदा – आडगाव ह्या गटातून तर कासोदा, विखरण, उत्राण ह्या गणातून आपले उमेदवार उभे करणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच या निवडणुकीच्या आरक्षणामुळे मातंबर व सक्षम उमेदवार देण्यास सर्वच पक्षांना उमेदवारासाठी शोधाशोध करावी लागली आहे व विद्यमान व प्रतिष्ठित उमेदवाराचा हिरमोड झाला आहे.