पं.स.सदस्या रूपाली साळुंखे यांची गळफास घेवून आत्महत्या

0

पतीसह सासू सासर्‍यांवर गुन्हा दाखल करण्याचा माहेरच्या मंडळींचा पवित्रा

चाळीसगाव । तालुक्यातील पंचायत समितीच्या दहीवद गटातील मेहुणबारे गणाच्या सदस्या रूपाली पियुष साळुंखे यांनी आपल्या राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेल्याची घटना सकाळी 5 वाजेच्या सुमारास उघडकीस आला असून या घटनेमुळे परीसरात एकच खळबळ उडाली आहे. मयत रूपाली साळुंखे यांनी गळफास का घेतली याबाबत कारण अद्याप अस्पष्ट आहे. मयत रूपालीच्या माहेरच्या मंडळींसह नागरीकांची मेहुणबारे पोलीसात एकच गर्दी असून पती पियुष साळुंखे यांच्यासह सासु आणि सासरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा पवित्रा घेतला आहे.

धुळे रूग्णालयात शवविच्छेदनाची मागणी
मिळालेल्या माहितीनुसार, दहीवद गटातील मेहुणबारे गणाच्या पंचायत समिती सदस्या रूपाली पियुष साळुंखे (वय-22) रा. चाळीसगाव यांनी रविवारी रात्री जेवून आटोपल्यानंतर सर्वजण पुढच्या रूममध्ये झोपले. रूपालीने मधल्या घरात जावून आतून कडी लावली दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. नेहमीप्रमाणे सकाळी सर्वजण उठल्यानंतर दरवाजा बंद असल्याचे दिसून आले. पतीसह सासू आणि सासर्‍यांनी दरवाजा ठोकून आवाज देण्याचा प्रयत्न केला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजा तोडला. हा प्रकार सकाळी 5 वाजेच्या सुमारास घडला. रूममध्ये आत डोकवून पाहिल्यानंतर रूपालीने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीन मृतदेह खाली उतरवून चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. येथील वैद्यकिय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषीत केले. मयत रूपाली साळुंखे यांनी 11 महिन्याची मुलगी असून त्या मेहुणबारे गणाच्या पंचायत समिती सदस्या होत्या. पारोळा तालुक्यातील टिटवा हे त्यांचे माहेर असून रूपालीने गळफास घेतल्यानंतर त्यांनी माहेरच्या मंडळींनी चाळीसगाव गाठले. दरम्यान, पती पियुष साळुंखे आणि सासू आणि सासरे यांच्या वर मुलीची पिळवूक आणि छळप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा आणि मयत रूपालीच्या मृतदेहावर धुळे जिल्हा सामान्य रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात यावे असा पवित्रा घेत त्यांनी मेहुणबारे पोलीसा स्थानकात ठाण मांडून बसले आहे.