पं.स. सभापतीपदाचे आरक्षण जाहीर

0

जळगाव : जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापतीपदाच्या आरक्षणाची सोडत सभा शुक्रवारी संपन्न झाली. त्यानंतर जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापतीपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) मनोहर चौधरी, उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील उपस्थित होते. यावेळी चक्रानुक्रम पद्धतीनुसार थेट व उर्वरित सोडत पद्धतीने आरक्षणे जाहीर करण्यात आले. कुणाल किरण मराठे या बालकाच्या हस्ते सोडत काढण्यात आल्या.

जाहीर झालेले आरक्षण याप्रमाणे
अनुसूचित जाती महिला, मुक्ताईनगर- अनुसूचित जमाती महिला, एरंडोल- अनुसूचित जमाती महिला, अमळनेर- अनुसूचित जमाती, जामनेर- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, धरणगाव- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, भुसावळ- नागरिकांचा मागास प्रवर्ग, बोदवड- नागरिकांचा मागास प्रवर्ग, यावल- सर्वसाधारण महिला, रावेर- सर्वसाधारण महिला, पारोळा- सर्वसाधारण महिला, चाळीसगाव- सर्वसाधारण महिला, पाचोरा- सर्वसाधारण, चोपडा- सर्वसाधारण, भडगाव- सर्वसाधारण.

असा आहे निवडणूक कार्यक्रम
निवडणूक कार्यक्रमानुसार 10 जानेवारी रोजी या निवडणूकीसाठी अधिसूचना जारी होईल. 17 जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करता येतील. 18 जानेवारीला अर्जांची छाननी होईल. 20 जानेवारी ही अर्ज माघारी घेण्याची अखेरची मुदत असेल. निवडणूक 3 फेब्रुवारी रोजी असून मतदानाची वेळ सकाळी 8 ते सायंकाळी 4 आहे. मतमोजणी 6 फेब्रुवारी रोजी होणार आहे.