पक्षांना उमेदवार न मिळाल्याने शेवटच्या दिवशी उडाली तारांबळ

0

नवापूर । नवापूर नगर पालिका निवडणुकीतील आज उमेदवारी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवशी तहसील कार्यालय आवार तसेच पक्ष कार्यालय अनेक प्रभागात जणु यात्राच भरली होती. उमेदवार समर्थकासह ढोल तासे वाजवत उमेदवारी अर्ज सादर करत होते. पक्षाचे बँनर,घोषणा,चिन्हाचे मफलर घालुन कार्यकर्त उमेदवार दिसत होते. एकच धावपळ सुरु होती. अनेकांना ऐन वेळी झोपेतुन उठवुन इच्छा नसतांना उमेदवारी अर्ज दाखल करायला लावली असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. नगराध्यक्षपदासाठी खुपच शोधाशोध करावी लागली. यावेळी खुपच ताणाताण झाला. अखेर उमेदवार भेटला व अर्ज दाखल झाला.

नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल
शेवटच्या दिवशी भाजप शिवसेना युती, काँग्रेस, राष्ट्रवादी व बहुजन समाजवादी पार्टी व अपक्ष,नवापूर विकास आघाडी यांनी नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार यांचे अर्ज सादर केले. नगराध्यक्षपदासाठी भाजपाकडून ज्योती दिपचंद जयस्वाल, शैला भिकाजी टिभे व काँग्रेसकडून दिपिका हेमंत पाटील, हेमलता अजय पाटील, सुरैबा फारुक शाह समाजवादीपक्षाकडून अज्मीना जावेद शेख तसेच नवापूर विकास आघाडी कडुन सोनल धर्मेद्र पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

खासदार गावितांची उपस्थिती
यावेळी उमेदवारी दाखल करतांना खा. डॉ. हिना गावीत,जिल्हा सरचिटणीस डॉ. कांतीलाल टाटीया,एजाज शेख,अनिल वसावे,सविता जयस्वाल उपस्थित होते. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख संजय उकीरडे,जिल्हा प्रमुख आमशा पाडवी, जिल्हा संघटक रामभाऊ वाडीले,उपजिल्हा प्रमुख हसमुख पाटील,तालुका प्रमुख गणेश वडनेरे आदि उपस्थित होते. आ. सुरुपसिंग नाईक,माजी खा. माणिकराव गावीत,युवा नेते भरत गावीत,शिरिषकुमार नाईक आदि उपस्थित होते.

बसपातर्फे संगीता सावरे
बहुजन समाज पार्टीतर्फे बसपा जिल्हा महासचीव गजानन सावरे यांची पत्नी संगीता गजानन सावरे यांनी नगराध्यक्षपदासाठी फॉर्म भरला. यावेळी बसपा प्रदेश सचीव योगेश ईशी, प्रभारी बाळा ब्राम्हणे, सहसचीव प्रताप पेंढारकर सुनिल महिरे, सचीव आर.आर. महाले, विधानसभा संपर्क सचीव विश्‍वास पवार, अध्यक्ष मोहनसिंग पाडवी (आदिवासी समाज), जि. प्रभारी(आ स.) अमित वसावे उपस्थीत होते. चुरसीचे चित्र 25 नोव्हेंबर रोजी छाननी व 30 ला माघारी नंतर स्पष्ट होणार आहे.