जळगाव । पक्षाघात म्हणजेच पॅरालीसिसबाबत समाजात अनेक गैरसमजुती आहेत. पण वेळीच लक्षणे ओळखल्याने 84 वर्षे वयाच्या रुग्णासही पूर्ण बरे करण्यात वोक्हार्ट हॉस्पिटल नाशिकचे मेंदुरोग तज्ञ डॉ धनंजय डुबेरकर व त्यांच्या टीमला यश आले. काही दिवसांपूर्वी श्री. दीक्षित नावाच्या 84 वर्षीय गृहस्थांना पक्षाघाताच्या लक्षणांसाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना दीड तासाच्या आत थोरेंबॉलिसिस नावाचे उपचार मिळल्यामुळे त्यांच्या परिस्थितीत 48 तासात पुर्णतः सुधारणा झाली. पक्षाघाताच्या आजारात पाहिले साडेचार तास खूप महत्त्वाचे असतात. पक्षाघातामधे सुरुवातीचे साडे चार तास हे सुवर्णक्षण म्हणून संबोधले जाते, पक्षाघाताने येणार्या अपंगत्वाला वेळीच थांबवता येऊ शकते. रुग्णाला जिथे सी.टी.स्कॅन किंवा एमआरआयची सुविधा उपलब्ध असते आणि मेंदू विकारात उपलब्ध असतात अश्या हॉस्पिटलमध्ये जाऊन टीपीए इंजेक्शनची विचारणा करावी असे केंद्रप्रमुख विनोद सावंतवाडकर यांनी नमूद केले.