अहमदनगर – देशभरातील निवडणुकांसाठी मी भाजपतर्फे प्रचारासाठी जाते. त्यामुळे निवडणुकांमध्ये माझी जबाबदारी वाढते, विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन चालू होते तरी मला प्रचारासाठी मध्य प्रदेशला जावे लागले, उद्या तेलंगणातही मला प्रचारासाठी बोलावले आहे. आज नगरमध्येही मी प्रचारासाठीच आले आहे. आता पक्षाने मला प्रचारमंत्री पदाचा दर्जा द्यावा असे आवाहन मी सुजितसिंग ठाकूर यांना करणार आहे असे मिश्किल शब्दात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. त्या आज अहमदनगर महानगर पालिका निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलत होत्या.
अहमदनगर महापालिका निवडणुकांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे यांनी नगरमधील जनतेला संबोधित केले.
सारसनगर येथील सभेत बोलताना गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळाला दिला. तसेच येथील लोकांचं मुंडेसाहेबांवर आजही तितकच प्रेम असल्याच मुंडेंनी म्हटले. ‘भारतीय जनता पार्टीनं जेव्हा सुरुवात केली, तेव्हा जनता पार्टीच्या नांगरधारी शेतकरी या चिन्हावर मुंडेसाहेबांनी जिल्हा परिषदेची निवडणूक झाली होती. तेव्हा 28 वर्षाचा तरुण गोपीनाथ मुंडे जिल्हा परिषदमध्ये निवडूण आला. सन १९८० च्या दशकात मुंडे साहेबांनी पहिली निवडणूक लढवली आणि १९८४ मध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष झाले. त्यानंतर, मुंडेसाहेबांनी महाराष्ट्रातील बहुजनांना एकत्र करण्याच काम केलं. त्यामुळेच येथील लोक आजही कमळ म्हणजे ते मुंडेसाहेबांच का, अशी विचारणा करत असल्याचं पंकजा यांनी सांगितले.