अमळनेर । पक्षाने उमेदवारी दिल्यास लोकसभा निवडणूक लढवायला तयार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी पत्रकार परिषदेत एक प्रश्नाला उत्तर देताना दिली काही दिवसांपूर्वी एकनाथराव खडसे यांनी खासदार ए.टी.पाटील पुन्हा खासदारकीचे उमेदवार राहतील असे वक्तव्य केले होते. गेल्या काही दिवसांपासून उदय वाघांची नव्या लोकांना पक्षात आणण्याची धडपड आणि एकनाथराव खडसे यांच्याहस्ते जुन्या कार्यकर्त्यांचा सत्कार यातून भाजपमध्ये जिल्ह्यात गटबाजीचे चित्र दिसून येत आहे. माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी यांनी जुन्या कार्यकर्त्यांना पद द्यावे, अशी मागणी केली होती. त्याला खडसे यांनी रेटा लावत ए.टी.पाटील हेच खासदारकीचे उमेदवार असतील असे जाहीर केले. त्यावर राजकिय कुरघोडी करत जुन्या कार्यकर्त्यांना खूप संधी आणि पदे दिलीत कार्यकर्ता हा जुना नवा नसल्याचे सांगितले पक्षाची इच्छा असेल तर लोकसभा लढवेलच असे सांगितले.
उमेदवारीवरुन उलटसूलट चर्चा
महाराष्ट्रातील व मध्यप्रदेशातील राष्ट्रीय महामार्गाने जोडणारा मेहेरगाव धुळे खरगोन राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग करावा, अशी मागणी आमदार स्मिता वाघ यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करून शिंदखेडा रेल्वे उड्डाण पूल तसेच प्रशासकीय इमारत आदींचीही मागणी आ. वाघ यांनी केल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यातील भाजपमध्ये गतबाजीला सुरुवात झाली. हे अमळनेरच्या घटनावरून स्पष्ट झाले असले तरी आता लोकसभा आणि विधानसभा उमेदवार बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. डॉ.बी.एस.पाटील, अरुण पाटील, एम.के.पाटील यांचे तिकीट कापले गेले होते त्यामुळे ए.टी.पाटलांचे तिकीट ही कापले जाते की काय याबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.