पक्षाला मी का नको हे स्पष्ट करावे: खडसे

0

जळगाव: भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांना यंदा विधानसभेसाठी अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याला शेवटचे काही तसाच शिल्लक राहिलेले आहे. दरम्यान खडसे यांना याबाबत विचारणा करण्यात आली असता त्यांनी, ‘मुक्ताईनगरमधून तुमच्याऐवजी अन्य एखाद्या व्यक्तीचे नाव सुचवा, असे पक्षाने मला सांगितले होते, मात्र, कोणा एकाचे नाव सुचवणे माझ्यासाठी शक्य नव्हते कारण, माझ्यासाठी सगळेच एकनाथ खडसे आहेत,’ असे सांगत, मी का नको हे पक्षाने स्पष्ट करावे अशी मागणी एकनाथराव खडसे यांनी केली आहे. मुक्ताईनगरमध्ये कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

खडसे यांना उमेदवारी जाहीर झालेली नसल्याने समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. एका समर्थकाने तर आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरु आहे. कार्यकर्ते अपक्ष लढण्यासाठी खडसेंवर दबाव टाकत आहेत.