पक्ष्यांच्या किलबिलाटासाठी वृक्ष संवर्धन गरजेचे

0
राजेंद्र राणे ; रावेरला जलपात्रांसह कापडी पिशव्यांचे वाटप
रावेर:- मानवी जीवनात संगीताचे अनन्यसाधारण महत्व असून पक्ष्यांच्या किलबिलाटासारखे मधुर संगीत दुसरे नाही. या संगीताची निर्मिती निसर्गाने केली असून आपण त्याच्या जतनासाठी वृक्ष संवर्धन करणे आवश्यक असल्याचे मत वनपरीक्षेत्र अधिकारी राजेंद्र राणे यांनी येथे केले. शहरात पक्षी बचाव मोहिमेंतर्गत पक्ष्यांसाठी जलपात्र आणि प्लास्टिक बंदीसाठी नागरीकांना कापडी पिशव्या वाटप कार्यक्रमात बोलतांना केले.
पर्यावरण संतुलन गरजेचे – राणे
वन परीक्षेत्र अधिकारी राजेंद्र राणे यांनी प्लास्टिक वापराचे निसर्गावर होणारे दुष्परिणाम सांगून मानवी हितासाठी पर्यावरण संतुलन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रास्ताविकात मुरलीधर महाजन यांनी प्लास्टिक बंदी आणि पक्षी बचाव अभियान याविषयी सविस्तर माहिती दिली. यानंतर सुरज चौधरी यांनी नगरपालिकेची भूमिका स्पष्ट केली दिलीप वैद्य यांनी तयार केलेल्या प्लास्टिक बंदीची शपथ सर्वांनी घेतली . यानंतर सोपान पाटील, रमेश महाजन, सीमा भालेराव यांची समायोजित भाषणे झाली. वनरक्षक विकास सोनवणे यांनी माहिती दिली तर आदिवासी नेते दिलरुबाब तडवी यांनी मनोगत व्यक्त केले.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
रावेर येथील खान्देश माळी महासंघातर्फे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खान्देश माळी महासंघाचे महिला जिल्हा कार्याध्यक्ष  शकुंतला महाजन होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष संगीता अग्रवाल, नगरसेविका शारदा चौधरी, संगीता वाणी, माया अग्रवाल, मीनल अग्रवाल, जयंतागौरी नगरीया, सीमा भालेराव, सुनीता डेरेकर, अरुणा ढेपले  यांच्यासह माजी नगराध्यक्ष रमेश महाजन, सोपान पाटील, नगरसेवक सुरज चौधरी, गणपत शिंदे, एल.डी.निकम ,डी.डी. वाणी, आशिष अग्रवाल, लक्ष्मीकांत अंतुर्लीकर, दिलरुबाब तडवी, मोतीराम महाजन, उज्वल डेरेकर, देवेंद्र शाह यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यांनी घेतले परीश्रम : सूत्रसंचालन श्रीराम फौंडेशनचे दीपक नगरे यांनी केले तर आभार सुधीर महाजन यांनी मानले.  याप्रसंगी पत्रकार देवलाल पाटील, सुनील चौधरी, तुषार मानकर, जयंत भागवत, शालिक महाजन, आर.डी.वाणी आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी कांतीलाल महाजन, मीराबाई लोणारी, कासाबाई महाजन, छायाबाई महाजन, एन.आर.महाजन, पंडित महाजन, बबलूशेठ नगरिया, संजय महाजन, अतुल महाजन, पांडुरंग महाजन, गणेश महाजन, प्रवीण महाजन, सुनील महाजन, पवन महाजन, विशाल लोणारी, सीताराम लष्करे, स्वाती महाजन, राजू महाजन, शुभम महाजन, कैलास महाजन, दीपक महाजन, धीरज सोनार यांच्यासह कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.  रावेर येथील धरती पाईपचे संचालक दिलीप अग्रवाल यांनी 500 जलपात्र आणि 500 कापडी पिशव्या उपलब्ध करवून दिल्याने त्यांचे कौतुक करण्यात आले.