पक्ष जी जबाबदारी देईल ती पूर्ण करेल…..!

0

माजी खासदार तथा विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे

वरणगाव : रावेर सभेचे माजी खासदार तथा आमदार हरिभाऊ जावळे यांनी नगरपालिकेत सदिच्छा भेट दिली. नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष व नगरसेवक आणि नगरपालिका कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. या प्रसंगी उपस्थित पत्रकार बांधवांनी,तुमची खासदारकीसाठी पुन्हा समाजात चर्चा सुरू झाली आहे ? असा प्रश्न विचारला असता मी पक्ष आदेश माणणारा कार्यकर्ता असून पक्ष जी जबाबदारी देईल ती पूर्ण करेल, असे उत्तर दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. वरणगांव नगरपरीषदेत शनिवारी रावेर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार तथा आमदार हरीभाऊ जावळे यांनी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी आमदार हरिभाऊ जावळे याचे जोरदार स्वागत करण्यात आले. या प्रसंगी जावळे म्हणाले की, आमदारकीच्या खालची निवडणूक लढणार नाही एवढे मात्र खरं…! असे सांगण्यास ते मात्र विसरले नाही. या प्रसंगी नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक शेख युसुफ, भाजपाचे जेष्ठ नेते प्रा.जतीन मेढे, भुसावळचे माजी नगरसेवक परीक्षित बराटे, भाजपा जेष्ठ कार्यकर्ते अल्लउद्दिन सेठ, कामगार नेते मिलिंद मेढे, सामाजिक कार्यकर्ते संजीव कोलते, इरफान पिंजारी, साजिद कुरेशी, माजी सभापती राजेंद्र गुरचळ, माजी सरपंच शेख सईद शेख भिकारी,ज्ञानेश्वर घाटोळे, प्रवीण ढवळे उपस्थित होते.

सुरवातीला नगराध्यक्ष- सुनिल काळे यांनी माजी खासदार तथा आ.हरीभाऊ जावळे यांचा सत्कार केला. नगरपरिषदेच्या वतीने व मागण्यांचे निवेदन दिले कर्मचारी यांचे 100 टक्के समायोजनाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी आ.हरिभाऊ जावळे यांच्याकडे करण्यात आली. आमदार हरिभाऊ जावळे म्हणाले की, कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जलसंपदा मंत्री गिरिष महाजन यांच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लाऊ तसेच वरणगांव नगरपालिकेला आगामी काळात मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन विकास कामांसाठी निश्चित मोठा निधी देतील . माझ्या खासदारकीच्या निवडणुकीत मला या शहरातील मतदार आणि कार्यकर्त्यांनी भरपूर प्रेम दिले आहे त्यामुळे आपल्या विकासाच्या कामासाठी मी सदैव तुमच्या सोबत आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.