पक्ष विरोधी भूमिका खपवून घेणार नाही; चंद्रकांत पाटीलांचे मुंडे-खडसेंना इशारा

0

सोलापूर : भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे हे पक्षात नाराज असून त्यांनी त्यांची नाराजी जाहीर उघड केली आहे. काल स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर आयोजित मेळाव्यात त्यांनी भाजपला लक्ष केले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यावर टीका देखील केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पंकजा मुंडे, एकनाथराव खडसे यांनी भाजप आणि फडणवीस यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी त्यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. पक्षशिस्तीसाठी कडक पावले उचलण्याचे संकेत दिले आहे. पक्षाविरुद्ध कारवाया करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला. ते सोलापुरात बोलत होते.

पक्षात काही मतभेद असतील, अडचणी असतील तर पक्षातील नेत्यांशी बोला, आपण त्यातून मार्ग काढू. पण रोज उठून पक्षाविरोधी कारवाया करत असाल तर गय केली जाणार नाही, अशा शब्दात चंद्रकांत पाटील बंड करणाऱ्यांना सुनावले.