नवी दिल्ली-तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर कॉंग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा आत्मविश्वास अधिक वाढला असून त्यांनी आता पक्ष शिस्तीकडे लक्ष केंद्रित केले आहे. पक्षातील चांगल्या कार्यकर्त्यांमुळे, नेत्यांमुळे पक्षाला फायदा होतो आहे, मात्र काही वाचाळवीर नेते, कार्यकर्त्यांमुळे पक्षाला नुकसान देखील सोसावे लागत आहे. याची दखल घेत आता राहुल गांधी यांनी पक्षातील गैरवर्तवणूक खपविली जाणार नसल्याचा इशारा दिला आहे.
कॉंग्रेसमध्ये अनेक नेते असे आहेत ज्यांच्यामुळे पक्षाला नुकसान होत आये. वादग्रस्त वक्तव्यामुळे विरोधक टीका करीत असतात, त्यामुळे पक्षाची बदनामी होते.
आज राजस्थान सरकारचे मंत्रिमंडळ स्थापन झाले. त्यात २३ मंत्र्यांचा समावेश आहे. १३ कॅबिनेट व १० राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली.