पगार कापल्यावरून महिलेस दमदाटी

0

जळगाव । पगार कापल्याच्या कारणावरून महिलेस दोघांनी शिवगाळ करून माहरण करण्याची धमकी दिल्याची घटना बुधवारी धडली. दरम्यान, याप्रकरणी महिलेने जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात दोघांविरूध्द तक्रार दाखल केली आहे. विद्यानिकेतन शाळेजवळील पंचायत समिती कार्यालयात बुधवारी पगार कापल्याच्या कारणावरून दोघांनी गोंधळ घातल्याचा प्रकार घडला. डेटा ऑपरेटर मनिशा राजेश शिंपी या महिला कर्मचारीचा वरीष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशावरून दोन दिवसांचा पगार कापला गेला. ही बाब मनिषा शिंपी यांना कळताच त्यांनी बुधवारी संगिता राजेश सुरळकर यांना विचारणा केली. त्यानंतर मनिषा यांनी वाद घातला. दरम्यान, त्या ठिकाणी संजय गंगाधार सोनवणे यांनी देखील सुरळकर यांच्याशी वाद घातला. त्यांनी नंतर पगार कापल्याच्या कारणावरून दोघांनी सुरळकर यांना शिवीगाळ करून दमदाटी केली आणि गोंधळ घातला.