पचन सुधारण्यासाठी अक्रोड उत्तम

0

नवी दिल्ली : अक्रोड खाऊन पचनसंस्थेचे आरोग्य सुधारते असे संशोधन आता पुढे आले आहे. जठरादि पचनेंद्रियांमध्ये पचनासाठी आवश्यक असलेले जीवाणू वाढविण्यासाठी अक्रोड मदत करतात. आक्रोडांचा समावेश असलेला आहार पचनासाठी उपकारक ठरतो.

पोटाच्या आरोग्याकडे आता सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. लुईसियानिया विद्यापीठातील लॉरी बायर्ले यांनी आक्रोडांचे महत्व अधोरेखित करणारे संशोधन केले आहे. पचन व्यवस्थित नसेल तर लठ्ठपणा, आतड्यांना सूज अशा समस्या निर्माण होतात. या अभ्यासात उंदरांना अक्रोड असलेला आहार देण्यात आला होता. त्यात असे आढळले की लॅक्टोबॅसिलस, रोझेबुरिया आणि रुमिनोकोकेसि या जीवाणुंची उंदरांच्या पोटातील संख्या वाढली.

माणसांनाही अक्रोडची मात्रा लागू पडते, असे वैज्ञानिकांनी सिद्ध केले आहे. अक्रोडमध्ये लिनोलेनिक आम्ल,ओमेगा ३ फॅटी एसिड आणि फायबर असते. त्यामुळे अक्रोड खाणे हा आरोग्याचा राजमार्ग ठरू शकतो असे शास्त्रज्ञांना वाटते. या सर्वांवर मात करीत हारवर्ड विद्यापीठातील वैज्ञानिकांनी गोगलगाय स्त्रवित असलेल्या स्त्रावाचा जखमा सांधण्यासाठी उपयोग होऊ शकतो असे दाखवून दिले आहे. हारवर्ड विद्यापीठातील जियान्यू ली यांनी असे संशोधन प्रसिद्ध केले आहे.

गोगलगायीच्या स्त्रावात धनप्रभारीत प्रथिनांची मालिका आणि हायड्रोजेलही असते. हे सर्व पेशीसमुह सांधण्यास उपकारक आहेत. हा गम वाळल्यावरही ठिसूळ नसतो. सुरुवातील डुक्करांची जखमी त्वचा जोडण्यासाठी याचा वापर करण्यात आला. नंतर त्याच्या रक्तवाहिन्या, लिव्हर आणि हृदयावरील जखमांवरही हा गम लावण्यात आला. विशेष म्हणजे या नाजुक भागांवरील जखमांसाठी स्त्राव असरदार ठरला. हा गम पृष्ठभागावर बसवला की १४ सेंटीमीटरपर्यंत ताणू शकतो. त्यामुळे त्याच्यात प्रचंड लवचिकता आहे. ही हालचाल करीत असलेल्या शरीरावरील जखमेला उपयुक्त आहे. जखमा शिवण्यासाठी टाके घालावे लागतात. हा गम त्यापासूनही सुटका करू शकेल. या मधील रासायनिक घटक शोधून नवा गम तयार करता येऊ शकेल असे शास्त्रज्ञांना वाटते.