ऐरोली : महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक ममित चौगुले यांनी ऐरोली सेक्टर 9, 10, सेक्टर 20, पटनी कंपनीच्या मैदानात 1000 मोठ्या रोपण केले. यावेळी नगरसेवक आकाश मढवी, नगरसेवक राजू कांबळे, माजी नगरसेवक राजू पाटील, ज्येेष्ठ नागरिक यांच्यासह अनेक युवा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. स्वच्छ भारत अभियांनंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राज्यात 4 कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला असून या वृक्ष लागवडीची सुरुवात ऐरोलीतून झाली आहे.