‘पटेल’च्या आठ विद्यार्थ्यांचे गणितात सुयश

0

शिरपूर। शिरपूर येथील आर.सी.पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचलित आर.सी.पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील गणित विभागातील आठ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह घवघवीत यश संपादन केले आहे. तसेच तेजस्विनी राजपूत, उन्नती सोनवणे व राजश्री रमेश जाधव यांची टी.सी.एस. कंपनीत स्तुत्य निवड झाली आहे. महाविद्यालयाचा गणित विभागाचा निकाल 75 टक्के लागला असून तेजस्विनी राजपूत व उन्नती सोनवणे या विद्यार्थिनींनी प्रत्येकी 96.50 टक्के गुण प्राप्त करुन गणित विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

यांनी केले अभिनंदन
जयश्री जाधव हिने 82 टक्के गुण मिळवून महाविद्यालयात दुसरा क्रमांक पटकावला आहे. शेख इकरा अन्वर हुसैन व भावना नाईकनवरे यांनी 79.50 प्रत्येकी गुण मिळवून गणित विभागात तिसरा क्रमांक पटकावला आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिश पटेल, नगराध्यक्षा जयश्री पटेल, उपनगराध्यक्ष भुपेश पटेल, चेअरमन राजगोपाल भंडारी, नगरसेवक तपनभाई पटेल, संचालक डॉ.के.बी.पाटील, सर्व संचालक, प्राचार्य डॉ. डी.आर.पाटील, उपप्राचार्य डॉ.ए.जी.सोनावणे, प्रा.आर.पी.महाजन, प्रा.जी.आर.चौधरी, प्रा.योगिता बडगुजर व विज्ञान शाखेतील सर्व प्राध्यापक यांनी कौतुक केले आहे.