शिरपूर । शहरातील मुकेश आर. पटेल इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये फन विथ बलून्स हा उपक्रम स्कूलच्या मुख्याध्यापिका स्मिता पंचभाई यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. फन विथ बलून्स या उपक्रमात दुसरीच्या वर्गातील भूमिका मराठे, ज्युनिअर केजी मधील तन्मय गरुड व दुपारच्या सत्रातील सिनियर केजी वैष्णवी बडगुजर, चैतन्य चौधरी या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी बलून किंग आणि बलून क्वीन या वेशभूषेत सादरीकरण केले.
यावेळी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या बलून्स बद्दल माहिती देण्यात आली. बलून्स संबंधी विविध उपक्रम साजरे करतांना विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसोबत खूप आनंद लुटला.