शिरपूर । शिरपूर येथील आर. सी.पटेल पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने घेतलेल्या प्रथम वर्ष परीक्षेत उत्तम यश संपादन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन
पॉलिटेक्निकमधील सिव्हील इंजि.या शाखेचा विजयसिंग पाटील हा विद्यार्थी 87.64 टक्के गुण मिळवून सर्वप्रथम आला. मेकॅनिकल इंजिनिअरींगमध्ये जयेश शिंपी 84.60टक्के गुण मिळवून प्रथम, कॉम्प्युटर इंजिनिअरींगमध्ये निधी गुजराथी 80.28 टक्के गुण मिळवून प्रथम, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये चेतन बडगुजर 74.07 टक्केगुण मिळवून प्रथम, इलेक्ट्रॉनिक टेलिकमुनिकेशन इंजिनिअरमधून या शाखेमधून गायत्री भैरव 76.56 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने यशस्वी रीत्या उत्तीर्ण झाले.
शिक्षकांचेही कौतूक
पॉलिटेक्निकचा सरासरी निकाल 52टक्के लागला. 2016-2017 हे पॉलिटेक्निकचे पहिलेच वर्ष होते. पहिल्याच वर्षी विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादन केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, पॉलिटेक्निकचे प्राचार्य नवीन हासवाणी यांनी सर्वांचे कौतुक केले आहे.