शिरपूर । आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाला 25 वर्षे पूर्ण होत आहे तरी रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने माजी विद्यार्थी सभा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा शिरपूर तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रभाकर राव चव्हाण यांनी भूषविले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. एस. जे. सुराणा, उपप्राचार्य डॉ. अतुल शिरखेडकर, अँल्युमिनि अस्सोसिएशनचे प्रमुख प्रा. डॉ. नितीन हसवानी, इन-चार्ज प्रा. डॉ. अनिल टाटिया, सेक्रेटरी प्रा. डॉ. प्रीतम जैन उपस्थित होते. हा भव्य स्नेह मेळावा एस. एम. पटेल ऑडिटोरियम हॉलमध्ये पार पडला. महाविद्यालयाची सुरुवात 1992 साली झाली असून 1996 ला बी.फार्मसीची पदवी हस्तगत केलेले तत्कालीन विद्यार्थी जे आता आप आपल्या क्षेत्रात मोठ्या हुद्द्यांवरती कार्यरत आहेत या मेळाव्यात सहभागी झालेले होते.
महाविद्यालय महाराष्ट्रात तिसरे
प्रा. डॉ. अनिल टाटिया यांनी प्रस्ताविक केले. प्रभाकर राव चव्हाण यांनी फार्मसी महाविद्यालयाचा गेल्या 25 वर्षातील प्रगतीचा आलेख हा प्रशंसनीय असून 25 वर्षाआधी अमरिशभाई पटेल यांनी सुरु केलेले हे महाविद्यालय महाराष्ट्रातून 3 रे तर भारतातून 14 स्थानावर पोहचले आहे असे नमूद केले. याचे संपूर्ण श्रेय प्राचार्य, प्राध्यापक व आजी माजी विद्यार्थी यांना दिले. महाविद्यालयाला 25 वर्ष पूर्ण झाली असून येथील विद्यार्थी भारतातातच नव्हे तर परदेशात नाव लौकिक करत आहे. प्राचार्य डॉ. एस. जे. सुराणा यांनी आढावा घेतला.उप-प्राचार्य डॉ. अतुल शिरखेडकर यांनी महाविद्यालयाचे अँल्युमिनिमुळे शिरपूर आणि आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाची ओळख संपूर्ण फार्मसी क्षेत्रात वाढत आहे. बर्याच बहू राष्ट्रीय फार्मा इंडस्ट्रीजमध्ये माजी विद्यार्थी बहू संख्येने कार्यरत आहे असे नमूद केले.
यांनी पाहिले कामकाज
आभार प्रा. डॉ. नितीन हसवानी यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापिका स्नेहल भावसार व हेमाक्षी चौधरी यांनी केले. आयोजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख प्रा. डॉ. एस. सी. खडसे, प्रा. डॉ. एस. एस. चालीकवार, प्रा. डॉ. हारून पटेल, प्रा. पंकज जैन, प्रा. डॉ. व्ही. जी. कुचके यांनी कामकाज पाहिले. संस्थेचे अध्यक्ष आ. अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष श्री. राजगोपाल भंडारी यांनी माजी विद्यार्थी मेळाव्या बद्दल समाधान व्यक्त केले.