पटेल महाविद्यालयात जागतिक युवा दिन साजरा

0

शिरपूर। आर. सी. पटेल महाविद्यालय व उपजिल्हा रुग्णालय शिरपूर यांचे संयुक्त विद्यमाने युवा दिन साजरा करण्यात आला. या. कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. डी. आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वप्रथम युवा विद्यार्थ्यांना युवादीनाची शपथ देण्यात आली. या कार्यक्रमानिमित्त विविध आजारांचे पोस्टर प्रदर्शन करून जनजागृती करण्यात आली.

आरोग्य जनजागृतीबाबत मार्गदर्शन
त्यात प्रामुख्याने एच. आय.व्ही., क्षयरोग, शिकलसेल व आहारासंबंधीची माहिती देण्यात आली. याची अधिकृत पुस्तिका विद्यार्थ्यांना देण्यात आली. उपजिल्हा रुग्णालय,शिरपूर येथून समुपदेशक श्री गोपाल वानखेडे , नानाभाऊ बडगुजर, सतीश माळी तसेच क्षयरोग विभागातून श्री धनराज पवार, शिकलसेल विभागातून पंकज चव्हाण यांनी सर्व विद्यार्थ्याना सखोल मार्गदर्शन केले. या कार्याक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. आनंदमाहेश्वरी प्रा. दीपक चव्हाण, अनिस बेग ,रा. से. यो. स्वयंसेवक गौरव गुजर, कल्याण महाजन , उमाकांत पाटील व योगेश कोळी आदींनी कामकाज पाहिले.