शिरपूर । येथील श्रीमती एच. आर. पटेल महिला महाविद्यालयात कारगिल विजय दिवस साजरा करणतात आला. कार्यक्रमास धुळे येथील विद्यावर्धिनी महाविद्यालयातील संरक्षणशास्त्र विषयाचे विभाग प्रमुख डॉ देवेंद्र विसपुते यांनी भारत पाक आणि भारत चीन संबंधावर विस्तृत विवेचन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाहिद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ राहुल गोपीचंद सनेर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य डॉ. के. बी. पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन पूजा देवरे हिने केले. कार्यक्रमास सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.