पटेल महिला महाविद्यालय सचिवपदी वैष्णवी पाटील

0

शिरपूर । पटेल महिला महाविद्यालयात विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेतून सचिव निवड प्रक्रिया महाविद्यालयाच्या विद्यार्थी सल्लागार समितीने विद्यापीठाच्या नियमानुसार लोकशाहीच्या मार्गाने वैष्णवी प्रमोद पाटील यांची विद्यार्थी परिषदेचे सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली. सचिव निवडणुकीच्या दिवशी विद्यार्थी परिषदेचे सल्लागार समितीचे सदस्य प्रा.डॉ.आर.एम.वाडिले, प्रा.डॉ.अतुल खोसे, प्रा.डॉ.विनय पवार, प्रा.डॉ.शोभा देवरे, प्रा.बी.आय परदेशी या समिती सदस्यने निवड प्रक्रिया राबवून प्राचार्या डॉ.शारदा शितोळे यांचा मार्गदर्शनाखाली सचिव निवड करण्यात आली. विद्यार्थिनीचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर प्राचार्यानी विद्यार्थी परिषदेला मार्गदर्शन केले. विद्यार्थी परिषदेचे सदस्यानि निवड प्रक्रिया सहभाग घेऊन निवडणूक शांततेत राबविली.

विद्यार्थी परिषदेचे सदस्य नीतिशा सोनवणे, हर्षदा मराठे, कपडे प्रज्वलला राजेंद्र, सुनिता पवार, पुजा पाटील, रविना शिंपी, माधुरी वाघ, वैशाली पगारे ह्या विद्यार्थी परिषद सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले. निवडणूक अधिकारी म्हणून प्रा.डॉ.आर.एम.वाडिले यांनी कामकाज पूर्ण केले.