पटेल विद्यालयाला नृत्य मल्हार महोत्सवात द्वितीय क्रमांक

0

पारंपारीक आदिवासी लोककलेचे सादरीकरण; प्राथमिक फेरीत यश

शिरपूर । तालुक्यातील खंबाळे येथील आर.सी.पटेल माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नृत्य मल्हार महोत्सव लोकनृत्याचा, महाराष्ट्राच्या परंपरेचा या नृत्य स्पर्धेत धुळे जिल्हास्तरावर प्राथमिक फेरीत द्वितीय क्रमांकाचे बक्षिस प्राप्त केले आहे. या यशाबद्दल विद्यार्थ्यांची सर्वत्र कौतुक होत आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, सह्याद्री दूरदर्शन, शालेय शिक्षण विभाग, प्राथषमिक व माध्यमिक मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने आयोजित नृत्य मल्हार महोत्सव लोकनृत्याचा, महाराष्ट्राच्या परंपरेचा या नृत्य स्पर्धेत धुळे जिल्हास्तरावर प्राथमिक फेरीत यश संपादन केले आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिश पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशपटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, नगरसेवक तपन पटेल, सचिव प्रभाकरराव चव्हाण, सीईओ डॉ. उमेश शर्मा, प्राचार्य आर.एफ.शिरसाठ यांच्यासह सर्व संचालक मंडळांनी कौतुक केले आहे. आठवी ते दहावीच्या २२ विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे. बुधवारी रात्री ७.३० वाजता नृत्य मल्हार हा कार्यक्रम प्रसारित होतो. विजेत्या विद्यार्थ्यांच्या नृत्याचे प्रक्षेपण लवकरच होणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे. विद्यार्थ्यांनास एस.आर.बोरसे, जे.पी.पाटील, एम.व्ही.पाटील, व्ही.एस.मासरे, सुजित जाधव, सी.आर.शिंपी व सर्व शिक्षक वृंद यांनी मार्गदर्शन लाभले.