शिरपूर । शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित अमरिशभाई आर. पटेल सी.बी.एस.ई. स्कूलचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला असून सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. तब्बल 11 विद्यार्थ्यांना 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळाले असून 33 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. प्रेम मिलींद गुजराथी 97 टक्के गुण मिळवून स्कूलमध्ये प्रथम क्रमांकाने यशस्वी झाला. सुमित दिलीप चौधरी 96 टक्के द्वितीय व युती संजयकुमार जैन 96 टक्के द्वितीय, निखिलेशसिंग कैलाससिंग राजपूत 95.80 टक्के तृतीय, तनुष्का सुदीप सिसोदे 94.60 टक्के चतुर्थ, सजल चंचल झंवर 93.80 टक्के पाचवी, चिराग निलेश देसले 92.40 टक्के सहावा, अनुष्का अनंत चव्हाण 92.20 टक्के सातवी, भक्ती जयपालसिंग गिरासे 92.20 टक्के सातवी, निवेश राजकुमार गुप्ता 91.60 टक्के आठवा, सलोनी नरेश डेंबरानी 90 टक्के नववा क्रमांक पटकावला. तसेच सुती संजयकुमार जैन व निखिलेशसिंग कैलाससिंग राजपूत या दोन विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयात 100 पैकी 100 गुण तर तनुष्का सुदीप सिसोदे हिने समाजशास्त्र या विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून विशेष यश संपादन केले.
विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
अमरिशभाई पटेल सीबीएसई स्कूलची दहावी परीक्षेचा द्वितीय बॅचचा निकाल 100 टक्के लागल्याने शाळेत खूपच आनंदाचे वातावरण आहे. दहावी परीक्षेला 50 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 11 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळविले. 33 विद्यार्थ्यांनी 75 टक्के ते 89 टक्के पर्यंत गुण मिळवून विशेष प्राविण्यासह स्थान पटकावले. 15 विद्यार्थी 60 ते 73.40 टक्के पर्यंत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, संचालक चिंतनभाई पटेल, सीईओ डॉ. उमेश शर्मा, प्राचार्य निश्चल नायर यांनी कौतुक केले.
सीबीएसईकडे आपला कल वाढवावा
शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भुपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांनी चांगल्या निकालाबाबत आनंद व्यक्त करतांना सांगितले की, सीबीएसई शिक्षणाचा फायदा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी उपयुक्त ठरत आहे. सीबीएसईच्या उच्चतम शैक्षणिक दर्जामुळे विद्यार्थ्यांना अगदी लहान वयातच स्पर्धा परीक्षांची तयारी होते. अनेक आय.ए.एस. व आय.पी.एस. अधिकारी हे सीबीएसईतीलच विद्यार्थी आजपर्यंत उच्च पदांवर कार्यरत आहेत. म्हणून शिरपूर तालुक्यातील विद्यार्थी सीबीएसई अभ्यासक्रमाकडे आकर्षित होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न शाळेमार्फत सुरु आहेत. आपल्या तालुक्यातून देखील उच्च पदस्थ अधिकारी तयार होत असून ही परंपरा मोठया प्रमाणात पुढे नेण्यासाठी प्रयत्न होत आहेत.