धुळे । येथे आलेल्या ‘सायन्स एक्सप्रेस’ ला तांडे, शिरपूर येथील मुकेशभाई पटेल मुला-मुलींची सैनिकी शाळा व कनिष्ठ विज्ञान महाविदयालयातील भविष्यातील बाल वैज्ञानिकांनी भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी विज्ञान किती सुंदर आहे याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
सायन्स एक्सप्रेस पाहत असताना सार्या बाल वैज्ञानिकांच्या चेहर्यावरती एक वेगळाच आनंद झळकत होता. या आनंदात बाल वैज्ञानिकांच्या सोबत शाळेचे प्राचार्य श्री. दिनेश राणा, विज्ञान शिक्षक नंदकिशोर बाविस्कर, सतिष सोमवंशी व लिपीक नितीन कलाल हे देखील या आनंदात सहभागी झालेत.