पटेल सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी

0

शिरपूर । तालुक्यातील तांडे येथील मुकेशभाई आर. पटेल मुला-मुलींची सैनिकी शाळा व कनिष्ठ विज्ञान महाविदयालयात लोकमान्य टिळक यांची 97 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस शाळेचे प्राचार्य दिनेशकुमार राणा यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर शिक्षक सतिश सोमवंशी यांनी विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन दहावीचा विद्यार्थी जतिन पाटील याने केले.

शिक्षक डी.बी.माळी, नंदकिशोर बाविस्कर, शशिकांत जाधव, शरद पवार, प्रदिप गिरासे, एस. पी. सोनवणे, नाना पवार, यतीन पाटील, अनिल रोकडे, ज्ञानेश्वर पाटील, मनोज बहारे, जितेंद्र चौधरी, मिलींद वाघ, शिक्षिका वेरोनिका फर्नांडीस, स्नेहा बुरसे, दिपश्री गोसावी, जोत्स्ना जाधव, नितीन कलाल, एन. बी. पाटिल, हेमंत बाविस्कर, विजय चव्हाण, बापू जाधव, किशोर पवार, मोहन माळी यांनी देखील टिळकांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.