पठाणकोट एक्स्प्रेस अमृतसर ऐवजी धुरी स्टेशनपर्यंत धावणार

0

भुसावळ- गाडी क्रमांक 11057 मुंबई-अमृतसर पठाणकोट एक्स्प्रेस 23 ते 29 जुलै दरम्यान अमृतसर रेल्वे स्थानकाऐवजी केवळ धुरी स्थानकापर्यंत धावणार आहे. फिरोजपूर रेल्वे विभागातील अमृतसर रेल्वे बोर्डांतर्गत नॉन इंटरलॉकींग प्रणाणीच्या कामासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय अप 11058 अमृतसर-मुंबई पठाणकोट एक्स्प्रेस 26 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान अमृतसर स्थानकाऐवजी धूरी स्थानकापासून सुटणार आहे. रेल्वे प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन भुसावळ विभागाचे डीआरएम आर.के.यादव यांनी केले आहे.

बिकानेर एक्स्प्रेस हिसार स्थानकापर्यंत धावणार
डाऊन 17037 सिकंदराबाद-बिकानेर एक्स्प्रेस सिकंदराबाद स्थानकापासून हिसार रेल्वे स्थानकापर्यंत चालवण्याचा निर्णय 24 जुलैपासून घेण्यात आला आहे तर अप 17038 बिकानेर-सिकंदराबाद एक्स्प्रेस 22 जुलैपासून हिसार स्थानकापासून सिकंदराबादपर्यंत चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही गाड्या या साप्ताहिक असून रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.