येरवडा । चंदननगर येथील विकास प्रतिष्ठानचे श्री पी टी पठारे महाविद्यालयात इ ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय पातळीवर नांदेड आणि नागपूर येथे झालेल्या स्पर्धेत अभिषेक ठाणगे, मनोज माने, निखिल जाधव यांनी १९ वर्ष वयोगटामध्ये सुवर्णपदक मिळवले आहे. तसेच किक बॉक्सिंग स्पर्धेत अभिषेक ठाणगे, निखिल जाधव यांनी सुवर्णपदक मिळविले तर हर्षद ढमढेरे यांनी कास्य पदक मिळविले.
कराटे स्पर्धेत आरती खंदारे, संकेत कार्ले यांनी कास्य पदक मिळविले. तसेच पुणे येथील झालेल्या कबड्डी स्पर्धेत मुलांनी तृतीय क्रमांक मिळवला. यावेळी विकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष महेंद्र पठारे, प्राचार्य अविनाश पर्हाड,उपप्राचार्य प्रीती कांबळे, क्रीडा प्रशिक्षक दिलीप मोडक, बाबासाहेब जाधवर व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजयी खेळाडूंचा गौरव केला. यावेळी महेंद्र पठारे यांनी विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन केले.