पडासदडे शिवारात जंगल पेटले ; मध्यरात्री आगीवर नियंत्रण

0

अमळनेर- तालुक्यातील पडासदडे शिवारात शुक्रवारी रात्री आठ वाजता जंगलाा अचानक आग लागली. पहाटे दोन वाजेच्या सुमारास अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवता आले. आगीनंतर अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले असलेतरी जंगलात गाडी जाऊ शकत नसल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागली. आग आटोक्यात आणण्याकरीता अमळनेर नगरपरीषदेचे अग्निशमन प्रमुख नितीन खैरनार, जब्बार पठाण, फारुख शेख, दिनेश बिर्‍हाडे, आनंदा झुंबल, राहुल सातपुते, भिका संदानशीव, आकाश बाविस्कर आदींनी प्रयत्न केले.