पडीक जागेला अचानक लागलेल्या आगीमुळे खळबळ

0

शिंदखेडा। जुने कोरदे ता. शिंदखेडा येथे गावालालागून असलेल्या पडीक जागेला 25 मे रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीमुळे गावात एकच खळबळ उडाली. गावातील राकेश राजपूत, सुदामसिंग गिरासे, आबा दाजी, प्रताप गिरासे, सागर पाटील व इतर तरुणांनी शर्थीने ही आग विझवण्याचा प्रयत्न केला.

या आगीच्या घटनेने गाव व परिसरात धावपळ उडाल्याचे चित्र होते.अग्निशमन दलाची दोंडाईचा नगरपालिकेची गाडी दाखल झाल्याने ही आग आटोक्यात आली. तत्काळ आग आटोक्यात आल्याने गावातील मोठी जीवत व वित्तहानी टळली. वार्‍यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले होते. या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. यावेळी पं. स.सदस्य शानाभाऊ सोनवणे देखील घटना कळल्यावर तेथे दाखल झाले. त्यांच्यासोबत विजयसिंग गिरासे, केदारसिंग गिरासे, पिंटू गिरासे, किरण सावळे व ग्रामसेवक उपस्थित होते.