पिंपरी : नातेवाईकासोबत दुचाकीवर बसून घरी निघालेल्या लहान मुलाच्या डोळ्यात रस्त्यावर काटलेल्या पतंगाचा लटकत असणारा मांजा घुसल्याने डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास काळेवाडी परिसरातील राजवाडेनगर येथे घडली. दुचाकीवर तो पुढच्या बाजूला बसला होता.
दरम्यान काळेवाडी परिसरातील राजवाडेनगर येथील रस्त्यावरून जात असताना अचानक काटलेल्या पतंगाचा मांजा त्याच्या दोन्ही डोळ्यामध्ये घुसला. दुचाकीचा वेग कमी असला तरी अचानक झालेल्या या घटनेने तो गाडीवरून खाली कोसळला. मांजा थेट डोळ्यात घुसल्याने डोळ्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. परिसरातील नागरिकांनी त्याला तात्काळ पिंपळे सौदागर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.