पतंगाच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला

0

देहुरोड : आंबेडकरनगर मामुर्डी येथे पतंग उडवण्याच्या वादातून एका अल्पवयीन मुलाने मित्राच्या वडीलांना दगडाने जीवघेणी मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि.8) सकाळी सव्वा नऊच्या सुमारास घडली. दीपक हुनमंत तपोदीसी (वय 25, रा. गांधीनगर, देहुरोड) असे जखमी इसमाचे नाव असून त्यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गंभीर जखमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी तपोदीसी यांचा मुलगा रस्त्याच्या कडेला पतंग उडवत असताना संबंधीत मुलाने तू इथे पतंग उडवू शकत नाही असे म्हणून दमदाटी केली. यावरुन तपोदीसी हे संबंधीत अल्पवयीन मुलास जाब विचारण्यासाठी गेले असता मुलाने त्यांनाच उलट उत्तरे देत पोटात लाथ मारत त्यांच्या डोक्यात दगड घातला. यामध्ये तपोदीसी गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर अल्पवयीन मुलगा पळून गेला असून देहूरोड पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास देहूरोड पोलीस करत आहेत.