पतंजलि योग समितीच्यावतीने विविध ठिकाणी योग शिबीरे

0

शिरपूर । शहरात तिसर्‍या अंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधुन पतंजलि योगपीठ हरीद्वार यांच्या तत्वानुसार भारत स्वाभिमान न्यास युवा भारत,किसान पंचायत , महिला पतंजलि योग समिती व पतंजलि योग समिती शिरपुरतर्फे विविध ठिकाणी योग शिबीर आयोजित करण्यात आले होते. शहरातील एस.पी.डी.एम.काँलेजच्या दादासाहेब विश्वासराव रंधे क्रिडा संकुलात, पां.बा.माळी म्युन्सिपल हायस्कुल, सरस्वती माध्य. विद्यालय व तालुक्यातील थाळनेर येथील संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालय याठिकाणी या शिबीर घेण्यात आले. यावेळी एन.एल.तडवी, तुषार रंधे, प्राचार्य. डॉ. एस.एन.पटेल यांच्यासह शहरातील अनेक योगा साधक उपस्थित होते. शकुंतला लॉन्स येथून पतंजलि योग समिती व योग विद्याधामच्या वतीने योग रॅली व रॅलीची सांगता श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात झाली. शिबीराचे आयोजन जितेंद्र शेटे’ ,किशोर गुरव, भगवान ठाकुर .वैशाली वाघ, मनोज अटवाल, शत्रुघ्न महाजन, राजेंद्र चौधरी, सुनिल गुरव, कल्याण सोनवण,े आनिल बोरसे, योगेश ईशी, उमेश पाटील, विजय बागुल, दिपक वाघ, हेमंत शेटे, जयपाल पंजवाणी, लिलाचंद गुजर व राकेश गुजर यांनी केले होते.