नंदुरबार । धुळे, नंदुरबार व जळगांव जिल्हा ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्था मर्या. धुळेच्या होत असलेल्या पंचवार्षिक निवणुकीसाठी विकास पॅनलतर्फे प्रचाराचा शुभारंभ करण्यात येवून जाहीरनामा जाहीर प्रकाशित करण्यात आला. 3 डिसेंबर रविवार रोजी होऊ घातलेल्या या पंचवार्षिक निवणुकीसाठी विकास पॅनलतर्फे पॅनलचे गटनेते प्रभाकर भामरे, रामराव बोरसे यांच्या उपस्थितीत नंदुरबार पंचायत समितीच्या सभागृहात नंदुरबार तालुक्यातील 125 ग्रामसेवकांची सभा घेवून प्रचारास शुभारंभ करण्यात आला. यावेळी पॅनलच्यावतीने जाहीरनामाही प्रकाशित करण्यात आला. विकास पॅनलचे शिट्टी चिन्ह असून एकुण 18 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
धुळे-नंदुरबार येथे मतदान केंद्र यात युवराज माधवराव भदाणे (धुळे), चयनसिंग गजेसिंग गिरासे (शिंदखेडा), गोकुळ गोरख ठाकरे (साक्री), अमरसिंग अर्जुन गावीत (साक्री), प्रभाकर प्रल्हाद भामरे (शिरपूर), अनिल पिराजी शिरसाठ (शिरपूर), गुणवत माधवराव पवार (अमळनेर), अशोक भबुता सोनवणे (शहादा), हिंमत रणछोड वंजारी (शहादा), शांतीलाल शिवदास बावा (तळोदा), कैलास महादू सोनवणे (नवापूर), गणेश सुरेश मोरे (नंदुरबार), तात्याभाऊ कृष्णा खरे (नंदुरबार), मनिषा अशोक बाविस्कर (धुळे), पुनम रमेश पाटील (शहादा), विजय साहेबराव सैंदाणे (शिंदखेडा), निवृत्ती वेडू काळे (धुळे), आनंदा ओजना पाडवी (अक्कलकुवा) यांचा समावेश आहे. मतदानासाठी धुळे व नंदुरबार येथे मतदान केंद्र राहणार आहेत. यात नंदुरबार जिल्ह्यात 431 तर धुळे जिल्ह्यात 428 असे एकुण 859 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.