भामेर । साक्री तालुक्यातील निजामपूर येथील म्हसाईमाता महिला सभासदांना नऊ टक्के लाभांश व भेटवस्तू देणार असल्याची माहिती पतसंस्थेचे संस्थापक लक्ष्मीकांत शाह यांनी 14 व्या वार्षिक सभेत बोलतांना सांगितले. म्हसाई माता महिला पतसंस्थेची वार्षिक सभा चेअरमन उर्मीला बेग शाह यांच्या अध्यक्षतेखाली झाली. 2016-17 या आर्थिक वर्षात पतसंस्थेचा निव्वळ नफा 39 लाख 39 हजार 444 रूपये झाला व नफ्यातून सभासदांना 9 टक्के लाभांश व पंखा भेट वस्तू म्हणून देण्यात येणार आहे. व्यासपीठावर व्हा.चेअरमन स्नेहल राणे, संचालीका योगीता शाह, वंदना शाह, संगीता जयस्वाल, कविता शाह, माया शाह, मिराबाई मोहने, वर्षा जाधव, सुनिता जायस्वाल, प्रिया भदाणे आदी उपस्थित होते. यावेळीगुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. नववी ते पदवीधर आणि पदव्युत्तर परिक्षेत यश प्राप्त केलेल्या पतसंस्थेच्या सभासद पाल्यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. वार्षिक सभेचे अहवाल वाचन व्यवस्थापक निलेश जायस्वाल यांनी केले.
यांची होती उपस्थिती
जिल्हा परिषद सदस्या उषा ठाकरे, पतसंस्थेच्या व्हा.चेअरमन स्नेहल राणे, पंचायत समिती सदस्य वासुदेव वाणी, रघुवीर खारकर, आदींनी मनोगत व्यक्त केले. सभेला जगदीश शाह, ललिता अरुजा, भगवान जगदाळे, दिलीप जाधव, भिकनलाल जायस्वाल, एम.एम.शिंदे आदी उपस्थित होते. आभार संचालिका वंदना शाह यांनी मानले. सभा यशस्वीतेसाठी पतसंस्था व्यवस्थापक निलेश जायस्वाल, रोखपाल नारायण मोरे, लिपीक जितेंद्र जाधव, जितेंद्र सोनवणे, भारत सूर्यवंशी, छोटू पाटील, आबा कोळी तसेच शाळेचे कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
विविध पुरस्काराने सन्मानित
पतसंस्थेला आतापर्यंत चार पुरस्कार मिळाले असून त्यात 2006 साली धुळे जिल्हा सहकारी पतसंस्थेचे सहकारी फेडरेशनचा, 2011 मध्ये राज्यव्यापी प्रतिबिंब अहवाल स्पर्धेत उत्तर महाराष्ट्रातून प्रथम पुरस्कार तसेच 2016 साली महाराष्ट्र राज्य सहकारी फेडेरेशनचा पुरस्कार मिळाला आहे. अवीज पब्लीकेशन व गॅलेक्सी इनमा पुणे यांच्यातर्फे प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.