पतसंस्थेत चोरी

0

भोसरी : पांजरपोळ येथील महात्मा फुले नागरी पतसंस्थेत 15 हजारांची चोरी झाली आहे. दोन चोरटे पंतसंस्थेच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली. पहाटेच्या सुमारास दोन अज्ञात चोरांनी पतसंस्थेचे शटर उचकटून आत प्रवेश करत कपाटातील 15 हजार रुपयांची रोख रक्कम चोरली. चित्रफीत पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्या विऱोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.