पता नही कब्र मे पहिली रात मेरे साथ क्या होगा

0

श्रीनगर । जरा सोचिए… अपनी कब्र मे खुद को, उस घने अंधेरे मे गड्ढे के अंदर बिल्कुल अकेला। उस अंधेरे मे आप मद्द के लिए चिल्लाएंगे लेकिन यह काफी संकीर्ण है आपको अपनी प्रार्थनाए याद आती है, आप संगीत को याद करते है। ( जरा विचार करा… स्वत:च्याच कबरीमध्ये स्वत:लाच, त्या घनदाट अंधारात खड्ड्यामध्ये एकदम एकटे. त्या अंधारात तुम्ही मदतीसाठी हाक देता. पण एवढंच पुरे आहे की तुमच्या हाडांना चिरडले जाते. तुम्हाला तुमच्या सर्व प्रार्थना आठवतात, तुम्ही संगीत आठवता.) हे बोल आहेत, ज्यात एक वेदना आहे, ज्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस अधिकारी फिरोझ दार यांनी चार वर्षांपूर्वी आपल्या मित्रांना ऐकवले होते.

मित्रांनाही ते शब्द स्मरत होते…
दार कुटंबिय शनिवारी जेव्हा शहीद फिरोझ यांच्या अंत्ययात्रेची तयारी करत होते तेव्हा दार यांनी 18 जानेवारी 2013 रोजी लिहलेल्या कवितेचे शब्द त्यांच्या मित्रांना आठवत होते. गावातील सर्वच जण दार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या घरी जमले होते. दार यांच्या दोन मुलींना, सहा वर्षांची अदाह आणि दोन वर्षांच्या सिमरनला समजत नव्हते एवढी लोक त्यांच्या घराजवळ का जमा झाली आहेत.

घातपाती हल्लयात झाले शहीद
अनंतनाग जिल्ह्यातील अचबल विभागात शुक्रवारी लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांनी घातपाताने केलेल्या हल्ल्यात पोलिस अधिकारी फिरोज अहमद दार यांच्यासह सहा पोलिस जवान शहीद झाले होते. पोलिसांच्या अनुमानानुसार लष्करने आपला कमांडर जुनैद मट्टूला ठार मारल्यामुळे पोलिस दलावर हल्ला केला होता.

फिरोझ दार यांची कविता
क्या अपने एक पल के लिए रुककर खुद से सवाल किया की मेरी कब्र मे मेरे साथ पहली रात को क्या होगा? उस पल के बारे मे सोचना जब तुम्हारे शव को नहलाया जा राहा होगा और तुम्हारे कब्र तैयार की जा रही होगी.। उस दिन के बारे मे सोचो जब लोग तुम्हे तुम्हारी कब्र तक ले जा रहे होंगे और तुम्हारा परिवार रो रहा होगा.। उस पल के बारे मे सोचो जब तुम्हे तुम्हारी कब्र मे डाला जा रहा होगा.। जरा सोचिए… अपनी कब्र मे खुद को, उस घने अंधेरे मे गड्ढे के अंदर बिल्कुल अकेला.। उस अंधेरेमे आप मद्द के लिए चिल्लाएंगे लेकिन यह काफी संकीर्ण है आपकी हड्डीयों को कुचल दिया जाता है.। आपको अपनी प्रार्थना याद आती है, आप संगीत को याद करते है.। आप हिजाब ना पहनने पर अफसोस जताते है। अल्लाह के आदेशों की अनदेखी करने पर आप पछतावा करेंगे लेकिन बच नही सकेंगे.। आप अपने कर्मोे के साथ अकेले रहेंगे, ना पैसा, ना आभुषण, सिर्फ कर्म अल्लाह सभी को कब्र की यातनाओंसे बचाता है। आमीन.